डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ‘लॉटरी’

आळेफाटा उपबाजारात तीन महिन्यांत ३५ कोटींची उलाढाल
farmers
farmerssakal
Updated on

नारायणगाव : जुन्नर (Junnar) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबजारात मागील तीन महिन्यात २ लाख ३२ हजार ३८० डाळिंब क्रेटची आवक झाली. डाळिंब क्रेटला (वीस किलो) प्रतवारीनुसार एक हजार ते साडेचार हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला. डाळिंब खरेदी विक्रीतून उपबजारात ३४ कोटी ८५ लाख रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली. डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने या वर्षी अवर्षणप्रवण भागांतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (farmers) लॉटरी लागली आहे.

टोमॅटोसह बहुतेक भाजीपाल्याला मागील तीन महिन्यांपासून मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब पीक अपवाद ठरले आहे. जुन्नर तालुक्यात सुमारे १३ हजार एकर क्षेत्रात डाळिंब फळबागा होत्या. डाळिंब फळबागेला कोरडे हवामान पोषक असते. मात्र, जुन्नर तालुक्यातील हवामानात आद्रता जास्त असल्याने डाळिंब फळ बागावर मोठ्या प्रमाणात खोड कीड, करपा, तेल्या आदी कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षात डाळिंब फळबागा काढून द्राक्ष लागवड केली आहे.

farmers
‘पीएमआरडीए’च्या हरकती मार्गी लावणार ; सुप्रिया सुळे

राज्याच्या बहुतेक भागात हीच स्थिती असल्याने डाळिंब फळ बागाखालील क्षेत्र कमी झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने मागील तीन महिन्यांपासून डाळिंबाचे भाव स्थिर असून, चांगल्या प्रतीच्या निर्यातक्षम भगव्या डाळिंबाला प्रतिकिलो दोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव मिळाला आहे.

farmers
पुणे-सोलापूर रस्त्यावर ‘एसटी’वर दगडफेक

याबाबत जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी सांगितले की, आळेफाटा उपबजारात जुन्नरसह श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, बारामती, नगर, जालना या भागांतील शेतकरी डाळिंब विक्रीसाठी घेऊन येत आहेत. अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांनी शेततळ्यात पाणीसाठा करून ठिबकद्वारे कमी पाण्यात डाळिंब बाग फुलवल्या आहेत. डाळिंब क्रेटला सरासरी दीड हजार रुपये भाव मिळून मागील तीन महिन्यात उपबाजारात ३४ कोटी ८५ लाख रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली. खरेदी केलेली डाळिंब जम्मू, राजस्थान, कलकत्ता, दिल्ली, उत्तरप्रदेश आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जातात.

farmers
कष्टाने पिकविलेला शेतमाल रस्त्याच्या कडेला फेकून देण्याची वेळ

असा मिळतोय बाजारभाव

आळेफाटा उपबाजारात जून महिन्यात १ लाख ५ हजार १४९ डाळिंब क्रेटची, जुलै महिन्यात ५० हजार २३१ डाळिंब क्रेटची, २५ ऑगस्टपर्यंत ७७ हजार क्रेटची आवक झाली. डाळिंब क्रेटला प्रतवारीनुसार अनुक्रमे ३५०० ते ४००० रुपये, १५०० ते ३५०० रुपये, ८०० ते १५०० रुपये, ५०० ते ८०० रुपये, असा भाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com