साडेआठ वर्षापूर्वी केलं होतं पळून जाऊन लग्न; आता घेतला घटस्फोट

लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे तीन महिन्यांतच ते विभक्त राहू लागले.
divorce
divorceesakal

पुणे : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यास घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे तीन महिन्यांतच ते विभक्त राहू लागले. सुमारे आठ वर्ष वेगळे राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केला. (Pune Divorced News)

दोघेही एकत्र नांदण्याची शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा दावा निकाली काढला. निशा आणि सुमीत असे या जोडप्याचे नाव आहे. दोघेही मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील एकाच गावात राहात. मैत्रीतून प्रेम संबंध निर्माण झाल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यास घरच्यांचा विरोध होता.

divorce
पुणे : ड्रेनेजचे पाणी घरात; समस्यांने सागरपार्क सोसायटी त्रस्त

त्यामुळे दोघांनी मुंबईला पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दोघेही नोकरीच्या शोधात पुण्यात आले आणि एका मॉलमध्ये कामाला लागले. लग्नानंतर सुमारे तीन महिन्यातच दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. पत्नीची पुण्यामध्ये नोकरीची व राहण्याची व्यवस्था करून सुमीत हा रत्नागिरीला गावी शेती करायला गेला. सुमारे आठ वर्ष विभक्त राहिल्यानंतर त्यांनी संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.

त्यामुळे दोघांनी घटस्फोटासाठी ॲड. शशिकांत बागमार, ॲड. निनाद बागमार आणि ॲड. गौरी शिनगारे यांच्यामार्फत संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता ३१ जानेवारी रोजी दावा दाखल केला. घटस्फोटासाठीचा सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा व लवकरात लवकर हा दावा निकाली काढण्यात यावा, असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयासमोर केला. दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्पत्याला आठ फेब्रुवारी रोजी म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये घटस्फोट मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com