पुणे - बहिणीशी प्रेमविवाह केल्याने मेहुण्याने त्याच्या दाजीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. शनिवारी रात्री ढोले-पाटील रस्ता परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मेहुण्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..किरण धनराज खरात (वय ३१, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साहिल गौतम जगताप आणि रोहन निगडे (वय ३१, दोघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत खरात याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण खरात हा अन्नपदार्थ वितरणाचे (डिलिव्हरी बाॅय) काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. खरात आणि तरुणीच्या प्रेमविवाहास कुटुंबीयांनी विरोध केला होता. त्यावरून खरात आणि आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये वादही झाले होते. दरम्यान खरात याची पत्नीची नुकतीच प्रसृत झाली आहे..शनिवारी (ता.९ ) रात्री साडेदहाच्या सुमारास खरात ढोले-पाटील रस्त्यावर थांबला होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी खरातला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या खरातला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.