चाकण - खराबवाडी, ता. खेड येथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला जबर मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तीच्या मुलांनाही प्रियकराने मारहाण केली. या प्रकरणी आरोपी सचिन रामआसरे यादव (वय-२३ वर्ष), मूळ रा. चंपापुर, ता. हडीया, जि. इलाहाबाद राज्य. उत्तरप्रदेश, सध्या .रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) याच्यावर अंतिमा पांडे (वय- ३८) हिच्या खूनप्रकरणी तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.