Gas Cylinder Black Market
sakal
पुणे - घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १०३ गॅस सिलिंडर आणि चारचाकी वाहनासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.