मंचर - आंबेगाव तालुक्यात जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत असलेल्या लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी (ता. २१) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क केला..तातडीने उपयायोजना करण्याविषयी सूचित केले. त्यामुळे पशु संवर्धन विभागातील अधिकारी व डॉक्टर आदि यंत्रणेने गायींच्या तातडीच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना प्रतिबंधक औषधांचे वाटप सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंचर, अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, काठापूर, धामणी आदि गावात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे काही शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत आले होते. या साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या ही घटना घडल्या होत्या..या पार्श्वभूमीवर शेतकरी आकाश शिंदे व संतोष भोर यांनी वळसे पाटील यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच वळसे पाटील यांनी तातडीने पशु संवर्धन आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून लम्पीग्रस्त भागांत त्वरित उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.त्यांच्या निर्देशानुसार, अवसरी खुर्द येथे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत वाळूंज, डॉ. विठ्ठल वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत औषधोपचार सुरू केले. प्रतिबंधात्मक औषधे व पावडरचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत माजी उपसरपंच स्नेहा टेमकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे, सुवर्णा क्षीरसागर, उर्मिला तांबे, शेतकरी शरद शिंदे पाटील व माजी सरपंच संगीता शिंदे पाटील यांनी सहभाग घेतला..'दिलीप वळसे पाटील यांच्या या कार्यतत्परतेमुळे व प्रशासनाच्या वेळेवरच्या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लम्पीचा प्रसार रोखून पशुधनाचे जीव वाचवण्यासाठी हे प्रयत्न मोलाचे ठरत आहेत.' अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली..'आंबेगाव तालुक्यात धामणी, काठापूर, लोणी, वडगाव पीर, वळती, चांडोली बुद्रुक, अवसरी बुद्रुक व बोरघर येथील पशुवैद्यकीय अधिकारी जागा रिक्त असून नऊ परिचारक यांच्याही जागा रिक्त आहेत. या जागा प्रशासनाने त्वरित भराव्यात या मागणीचा पाठपुरावा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल.'- वैभव उंडे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस..'आंबेगाव तालुक्यात ४१ संकरीत गायींना लम्पी साथीचा प्रादुर्भाव झाला. धामणी व अवसरी खुर्द येथे गायी दगावल्या आहेत. तातडीचे औषधोपचार सुरु आहेत. जवळच्या गुरांच्या दवाखान्यात उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे.'- डॉ. प्रशांत साळवे, पशुधन विकास अधिकारी, आंबेगाव तालुका..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.