Vadgaon Nimbalkar Crime : लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार! अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून गणेश मदने याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime
Crimesakal
Updated on: 

वडगाव निंबाळकर - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील गणेश रामदास मदने याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असून, पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com