
हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडी-माण परिसर पंचतारांकित असला तरी येथील वाहतूक समस्या कायम आहेत. हिंजवडी- माण रस्त्यावर मंगळवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारे तीन तास कोंडी झाली. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे पाऊस थांबला, पाणी ओसरले. मग वाहतुकीचे घोडे अडले कुठे? असा उद्विग्न सवाल आयटीयन्स करत आहेत.