विंग मळणी यंत्राजवळ काम करताना काळजी घ्या वेगळा विषय
मळणी यंत्रातील त्रुटी शेतकऱ्यांच्या जिवावर
सुरक्षिततेच्या उपाययोजना गरजेच्या; बेसावधपणा ठरतोय धोक्याचा, यंत्र मालकही जबाबदार
विंग, ता. ७ ः येथे मळणी यंत्रात साडीचा पदर अडकून ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. परिसरात यापूर्वीही घडलेल्या घटनावरून यंत्राद्वारे मळणी करताना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बेसावधपणा आणि यंत्रातील त्रुटीमुळेच महिलेला जिवाशी मुकावे लागले. पिकाच्या मळणीदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यासह तितकीच जबाबदारी यंत्र मालकांनी देखील घेण्याची गरज आहे.
मळणी यंत्रात साडीचा पदर अडकून येथील छाया खबाले (वय ६५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मागील आठवड्यात ही घटना घडली. महिलेचा बेसावधपणा नडला आणि मळणी यंत्रातील त्रुटीही त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. छाया खबाले या यंत्राच्या मागे चाळणीतून बाहेर पडणारी ज्वारी पोत्यात भरण्याचे काम करत होत्या. साडीचा पदर यंत्रातील बेल्ट जोडलेल्या फिरत्या शॉफ्टवर पडला आणि तो गुंडाळला. त्यासोबत त्याच्या डोक्यालाही तिकडेच वडण लागली. एकप्रकारे त्यांच्या गळ्याला साडीचा फास बसला. अखेर यंत्र बंद केले, मात्र यंत्रातील गतीमुळे त्यांना स्वतःची सुटका करण्यात अपयश आले. शिवाय अडकलेली साडी कापून त्यांची सुटका करण्या इतपतही वेळ मिळाला नाही. अखेर खुरपे शोधून साडी कापून सुटका त्यांची केली. तोवर त्यांनी जीव गमवला होता.
यातून एवढेच सिद्ध होते, की अनेकदा शेतकरी मळणी सुरू असताना बेसावधपणे काम करत असतात. चालू यंत्रात अडकलेली ज्वारी बाहेर काढतात, तर कधी मळणीदरम्यान यंत्राखाली पडलेली कणसे वाकून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. धान्य वाया जाऊ नये, असा शेतकऱ्यांचा अट्टहास असला, तरी अशा दुर्घटनांना त्यामुळे सामोरे जावे लागते. त्याठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची खरी गरज आहे.
यापूर्वी येरवळे येथे एका महिलेला असाच जीव गमवावा लागला होता. घारेवाडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली होती. मळणी यंत्राजवळ जबाबदारीने काम करणे सुरक्षितता बाळगणे आता या घटनेवरून निदर्शनात येते. यंत्रातील त्रुटी दूर करण्याचे काम त्या यंत्र मालकाचे आहे. त्यामध्ये अनेकदा त्रुटी घटनेनंतर समोर येतात. यंत्रमालक फारसे गांभीर्याने घेत नाहीत.
मळणी यंत्रातील ज्या फिरत्या शॉफ्टवर, बेल्टमध्ये पदर गुंडाळला जातो. त्यावर पत्र्याचे अवरण असणे गरजेचे आहे, ते त्याठिकाणी नव्हते. कदाचित एवढा मोठा प्रसंग घडला नसता.
--------------------------------
काळजी घेणे आवश्यक
घटनास्थळी पाहणीदरम्यान पोलिसांनी उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केल्या आहेत. शिवारात सध्या रब्बीतील ज्वारीची मळणी सुरू आहे. लवकरच गहू मळणी हाती घेतली जाईल. असे चित्र आहे. मळणीदरम्यान शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेणे, यासह यंत्र मालकांनी यंत्र सुस्थितीत ठेवणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.
------------------------------
कोट
मळणी यंत्रात पदर अडकून विंगला एका महिलेने जीव गमावला ही बाब दुर्दैवी आहे. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी यंत्राजवळ मळणी करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. काळजी घेणे गरजेचे आहे. यासह यंत्रमालकांनी यंत्राचे शाफ्ट उघडे न ठेवता. त्यावर पत्र्याचे अथवा जाळीचे आवरण बसवणे गरजेचे आहे.
- एस. डी. भिलारी, पोलिस उपनिरीक्षक, कोळे.
--------------------------
02223
विंग ः मळणी यंत्रातून ज्वारी बाहेर पडणाऱ्या चाळ्याच्या वरच्या बाजूला उघड्या शॉफ्टवर पदर अडकून अनेकदा अशा घटना घडत आहेत.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

