संत साहित्य संमेलनाध्यक्षपदी मदन गोसावी यांची निवड

कोल्हापूर येथे १८ सप्टेंबर रोजी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली
मदन गोसावी
मदन गोसावी sakal

पुणे : कोल्हापूर येथे होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील जेष्ठ कीर्तनकार मदन महाराज गोसावी यांची निवड करण्यात आल्याचे संमेलनाचे संयोजक डॉ. दत्तात्रय डुंबरे यांनी नुकतेच घोषित केले.

पुण्यातील विश्वात्मक संत साहित्य परिषदेकडून संत परंपरेचा अभ्यास व संशोधन केले जाते. कोल्हापूर येथे १८ सप्टेंबर रोजी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण चार उमेदवारांमधून गोसावी यांच्या नावाची शिफारस परिषदेकडे करण्यात आली. या बैठकीस पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव डॉ. विनय देव, वनविभागातील पुणे विभागाचे प्रमुख रंगनाथ नाईकडे, याशिवाय गोपीचंद कदम, डॉ. डुंबरे, राज्य न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे, अॅड धनर्वी कुलकर्णी,रमेश शिंदे, अॅड. अक्षय गोसावी,आदी उपस्थित होते.

मदन गोसावी
...म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे

मदन महाराज गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायकाची वाडी या गावात झाला. प्रतिकुल परिस्थितीत विधी शाखेतून त्यांचे शिक्षण झाले. पुढे राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी न्यायाधिश पदावर काम केले. मंत्रालयात विधी व न्याय खात्याचे सहसचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. या साहित्य संमेलनाचे यजमान म्हणून श्री क्षेत्र आदमापूर व राधानगरी तालुक्यातील येथील वारकरी संघटनेने जबाबदारी घेतली आहे.

याशिवाय औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालय व भाषा,साहित्य,संस्कती संशोधन परिषद हे ही सहआयोजकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे डॉ. प्रकाश खांडगे व बाबा पाटील यांनी कळविले आहे. या संमेलनात जगभरातील संत साहित्याचे अभ्यासक व उपासक उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीच्या काळातही संत साहित्याने दिलेली मनःशक्ती याविषयी विशेष परिसंवाद या संमेलनात आयोजित करणार असल्याचे रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले आहे.याशिवाय संत साहित्याची संशोधन केंद्र जगभर सुरु व्हावीत यासाठी विशेष कृतीयोजना आखणार असल्याचे डाॅ देव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com