माढा तालुक्यातील १०६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला गैरहजर
माढा तालुक्यातील १०६
विद्यार्थी परीक्षेला गैरहजर
दहावी परीक्षा केंद्रांवर पालक-विद्यार्थ्यांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २० : माढा तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच पेपरला १०६ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगितले.
माढा तालुक्यात दहावीची १८ परीक्षा केंद्रे आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार ५६५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पाच हजार ४५९ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला. १०६ विद्यार्थी पहिल्याच दिवशी पेपरला गैरहजर राहिले आहेत. पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर होता. अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी वाहनाने आले होते. परीक्षा केंद्रावर वाहने व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पहिल्या दिवशीच दिसून आली.
माढा तालुक्यातील दहावीच्या १८ परीक्षा केंद्रांवरील हजर विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : आंतरभारती विद्यालय, कुर्डुवाडी (४२६), सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला, माढा (४४१), श्री उमा विद्यालय, मोडनिंब (२८८), जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज, टेंभुणी (३६९), (कै.) विठ्ठलराव शिंदे माध्य. प्रशाला, निमगाव (टें) (२८५), संजीवनी विद्यालय, मानेगाव (२४७), संत सावता माळी विद्यालय, अरण (३३७), माध्यमिक आश्रमशाळा, माढा (४०२), माध्यमिक आश्रमशाळा, जामगाव (१७२), (कै.) विठ्ठलराव शिंदे माध्यमिक प्रशाला, अंबाड (३७४), माध्यमिक आश्रमशाळा केवड (१४७), महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी (२८६), विनायकराव पाटील विद्यालय, भोसरे (२३७), नूतन विद्यालय हायस्कूल, कुर्डुवाडी (२६०), संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, कुर्डुवाडी (२१६), बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले खुर्द (३१३), श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, रोपळे (क) (३००), न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी (३५९).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

