माढयातील क्रीडा संकुलसाठी तीन कोटी निधी मंजूर - आमदार अभिजीत पाटील
MDH26B05163
माढा : येथील क्रीडा संकुलातील कामाचे भूमिपूजन करताना आमदार अभिजित पाटील, मीनल साठे, राजेंद्र चवरे व मान्यवर.
........
माढ्याच्या क्रीडा संकुलासाठी
तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर
........
माढा, ता. ४ : माढा तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे मैदान मिळावे व त्यांना आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माढा शहरात क्रीडासंकुल कामासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले, की अनेक दिवसांपासून क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रलंबित असताना त्याचा पाठपुरावा करून त्याचा आराखडा तयार होऊन आज भूमिपूजन होत असताना मनापासून आनंद होत आहे. माढा तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे मैदान व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नक्कीच फायदा होईल. सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुढेही निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रीडा संकुलात इनडोअर खेळ हॉल, रनिंग ट्रॅक, क्रीडांगण, स्वच्छतागृह व अभ्यासिका, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र जिम, प्रशस्त हॉल, चेंजिंग रूम यासह अद्ययावत सोयी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी नगराध्यक्षा मीनल साठे, तहसीलदार संजय भोसले, तालुका क्रीडाधिकारी नदीम शेख, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, राजाभाऊ चवरे, आनंद कानडे, बालाजी पाटील, नितीन कापसे, संतोष दळवी, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

