माथाडी निरीक्षक भरतीची चौकशी करा ः अंधारे

माथाडी निरीक्षक भरतीची 
चौकशी करा ः अंधारे
Published on: 

पुणे, ता. १५ ः माथाडी कामगार निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत, ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी केली.
एमपीएससीच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी पुलावर १२ दिवस आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी माथाडी कामगार निरीक्षक २०२६ पदाच्या भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या भरतीसाठी एकूण ६२ जागा असून, निकालातील पहिल्या २४ क्रमांकांवरील विद्यार्थी नागपूर येथील एकाच केंद्रातील आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले असताना, या परीक्षेत मात्र त्यांना १८९ ते १९८
गुण मिळाले आहेत. परीक्षेच्या अभ्यासक्रमात ५२ कायद्यांचा समावेश असताना, त्याबाहेरील दोन कायद्यांवर तब्बल २४ प्रश्न विचारण्यात आले असून या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठी वाढ झाली का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर निकालाची पीडीएफ एका खासगी व्यक्तीच्या एक्सेल शीटमधून तयार झाल्याचा सांगत, निकालाच्या मेटाडेटाची, संगणक प्रणालीची, सीसीटीव्ही फुटेजची आणि डिजिटल नोंदींची न्यायवैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
-------
रोहित पवार यांचे योगदान महत्त्वाचे
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी बारा दिवस दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे अंधारे यांनी सांगितले. पवार यांच्या हेतूबद्दल कोणतीही शंका नसल्याचे सांगत, माध्यमांमध्ये अर्धवट संदर्भ दाखविल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com