

Dr. Madhav Gadgil
esakal
जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.