Pune Rain : मढेघाट धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; १३ गावांचा वाहतुकीचा संपर्क तुटला

मढेघाट धबधब्याकडे जाणारा केळद खिंड रस्ता खचल्याने १३ गावांचा वाहतूक संपर्क तुटला; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पर्यटक व नागरिकांची मोठी गैरसोय
The closure has disrupted connectivity for 13 villages, while authorities have urged residents and tourists to avoid the route.

The closure has disrupted connectivity for 13 villages, while authorities have urged residents and tourists to avoid the route.

Sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील प्रसिद्ध अशा मढेघाट धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर केळद खिंडीमध्ये रस्त्यास मोठी आडवी भेग पडल्याने रस्ता सोमवार (ता.०६) रोजी खचला असून हा रस्ता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. केळद तसेच मढे घाटाकडे वाहनाने जाणे शक्य नसल्याने परिसरातील तेरा गावांचा वाहतुकीसाठी संपर्क तुटला असल्याची माहिती राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com