माढेश्वरी मंदिरासाठी ४.६६ कोटींचा निधी मंजूर -रणजितसिंह शिंदे

माढेश्वरी मंदिरासाठी ४.६६ कोटींचा निधी मंजूर -रणजितसिंह शिंदे

Published on

MDH25B04979
श्री माढेश्वरीदेवी
---
MDH25B04978
रणजितसिंह शिंदे
---
श्री माढेश्वरी मंदिरासाठी
४.६६ कोटींचा निधी मंजूर
रणजितसिंह शिंदे यांच्या मागणीला यश
माढा, ता. १ : माढ्यातील श्री माढेश्वरीदेवी मंदिराच्या विविध विकास कामांसाठी ४ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांचा निधी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
या कामाबाबत माहिती देताना श्री.‌ शिंदे म्हणाले, २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता लेखाशीर्ष गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके या योजनेतून पुणे पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी संदर्भित केलेल्या पत्रानुसार माढ्यातील श्री माढेश्वरीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धार व परिसराचे सुशोभीकरण करून एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनस्थळ बनावे, यासाठी तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी व पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केला होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये नमो तीर्थस्थळ योजने अंतर्गत ३ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतून बरीच कामे मार्गी लागली आहेत. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ही कामे सुरू होणार आहेत.
---
चौकट
मंजूर निधीतून होणार ही कामे...
या निधीतून दगडांची स्वच्छता करणे, ओवरींचे संपूर्ण काम करणे, नैसर्गिक रंगकाम करणे, उत्तरेकडील पदपथ तयार करणे, विटेची कमान बांधणे, साफसफाई काम करणे व इतर आनुषंगिक कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com