MAH CET Registration Begins for M.P.Ed and M.Ed Courses
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात येणाऱ्या एम.पी.एड आणि एम.एड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस सुरवात झाली आहे. या दोन अभ्यासक्रमाच्या सीईटीपासून २०२६ या वर्षातील सीईटी परीक्षेच्या नोंदणीस प्रारंभ झाला आहे. ही नोंदणी २० जानेवारीपर्यंत ऑनलाइन होणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरवात होणार आहे.