महापुरुषाला आपापल्या जातीचे आयडॉल करून आभाळा एवढ्या उंचीच्या माणसाला लहान करण्याचा प्रयत्न
‘महापुरुषांना आपापल्या जातीचे
आयडॉल करून लहान करू नका’
मंगळवेढा, ता. २१ : समाजात बदल घडण्यासाठी महापुरुषांनी काम केले. या सर्व महापुरुषांना आपण साचेबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. या मानवतावादी दृष्टिकोन ठेवणाऱ्या महापुरुषांना आपापल्या जातीचे आयडॉल करून आभाळा एवढ्या उंचीच्या माणसाला लहान करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ते प्रयत्न पूर्णपणे बंद झाले पाहिजे आहेत, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी व्यक्त केले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भाळवणी येथे नव्याने बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच लक्ष्मण गायकवाड स्वप्निल काळुंगे पांडुरंग चौगुले, धन्यकुमार पाटील, चारुदत्त पाटील, सत्यवान कोडक, दामाजी माने, विजय जाधव, नानासाहेब मोरे, सिद्धेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते. छत्रपती परिवाराचे अध्यक्ष पवार म्हणाले की जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मानवता व एकोप्याची भावना जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, या अनेक महापुरुषांनी समाजामध्ये समाजामध्ये मानवतावादासाठी काम केले आणि हे सगळे महापुरुष मानवतावादीचे पुजारी आहेत. त्यांना त्याच चौकटीत ठेवून जयंतीचे सोहळे यशस्वी करावेत. अलीकडच्या काळात जयंती सोहळ्याच्या निमित्ताने डीजेवर थिरकरणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात दिसत आहे. समाजाने अशा महापुरुषाचा किमान आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याची गरज आहे. क्रांतीलाल इरकर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय साखरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

