
लवकरच यासाठी निवड चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती हिंदकेसरी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. योगेश दोडके यांनी दिली.
पुणे : कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरुन अनेक खेळ हळूहळू सुरु होत असताना आता महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेलाही मार्गही मोकळा झाला आहे. राज्य सरकारने प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा भरवण्यास परवानगी दिल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारी अखेरीस ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडण्याची शक्यता आहे. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. योगेश दोडके यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच यासाठी निवड चाचणीला सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्रीडा क्षेत्राला फटका बसला होता. महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील मल्लांचा शड्डूचा आवाज लॉकडाऊनमुळे बंद झाला. महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेनंत आता मल्लांचा शड्डू पुन्हा घुमणार असला तरी कुस्ती शौकिनांना प्रत्यक्षात या लढती पाहता येणार नाहीत.
तब्बल नऊ महिन्यानंतर महाविद्यालये होणार सुरु
या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात राज्य कुस्तीगीर परिषद राज्य सरकारसोबत पाठपुरावा करत होती. याला यश मिळाले असून स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 जानेवारीला कुस्ती परिषदेच्या कार्यकारणीची सभेत स्पर्धेच्या तारखा पक्क्या होतील, अशी आशा आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही राज्य सरकारने कोरोना संबधीत जारी केलेल्या आदेश आणि नियमांचे पालन करुन पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडामंत्री सुनिल केदार आणि क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बखोरिया यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजना संदर्भात हिरवा कंदिल दाखवला.