महाबळेश्वर तालुक्यात ''महाराजस्व समाधान शिबीर'' अभियानाचा धडाका; प्रलंबित महसूल कामे आता मार्गी लागणार

महाबळेश्वर तालुक्यात ''महाराजस्व समाधान शिबीर'' अभियानाचा धडाका; प्रलंबित महसूल कामे आता मार्गी लागणार

Published on

महाबळेश्वरात महाराजस्व समाधान शिबिर अभियान

तहसीलदार सचिन मस्के; मंडलनिहाय अर्ज कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर, ता. १ ः महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या नवीन धोरणानुसार, महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील चारही महसूल मंडलांमध्ये विशेष शिबिरे होणार असून, नागरिकांनी दोन मार्चपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

सध्या तालुक्यात महसुली सजानिहाय गावोगावी पूर्वनियोजन बैठका सुरू असून, शिबिरात दिल्या जाणाऱ्या सुविधांचा प्रचार व प्रसार केला जात आहे. तापोळा मंडळमला सात मार्चला सकाळी १० वाजता पद्मावती मंदिर, तापोळा येथे, लामज मंडळामध्ये १४ मार्चला सकाळी दहा वाजता उचाट येथे, पाचगणी मंडलामध्ये १० एप्रिलला सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, भिलार येथे, महाबळेश्वर मंडळामध्ये १० एप्रिलला सकाळी १० वाजता मेटगुताड येथे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

या शिबिरांमध्ये भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि ७/१२ मधील दुरुस्त्या करणे, १९६५ ते २०२४ दरम्यान झालेल्या कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत ७/१२ वरील शेरे कमी करणे व नवीन नोंदी घेणे, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वाटप, शाळांमध्ये ‘कॅम्प मोड’वर विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप केले जाईल, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजूर आदेश देणे, ‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत पट्टे वाटप आणि पाणंद रस्त्यांचे प्रशासकीय आदेश उपलब्ध करून देणे, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान आणि तक्रार निवारणासाठी ‘एक खिडकी’ प्रणाली राबवली जाणार आहे. शिबिराच्या दिवशी कामाचा तत्काळ निपटारा व्हावा, यासाठी नागरिकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तलाठी, मंडलाधिकारी किंवा तहसील कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com