महाबीजकडून ८६ हजार ५८३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा

महाबीजकडून ८६ हजार ५८३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा
Published on

पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प
--
परभणी विभागात ७५ टक्के बियाणे विक्री

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम २०२६ साठी विविध पिकांचे ८७ हजार २४५ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यापैकी ८६ हजार ५८३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अधिकृत विक्रेत्यांकडे करण्यात आला असला, तरी समाधानकारक पाऊस नसल्याने बियाण्यांची विक्री ठप्प झाली असल्याची माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक जगदीशसिंग खोकड यांनी दिली.

परभणी विभागात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. खरीप २०२५ मधील बिजोत्पादन कार्यक्रमातून यंदासाठी ८७ हजार २४५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. यामध्ये सोयाबीनचे ८४ हजार ५० क्विंटल, तुरीचे १,३२३ क्विंटल, उडदाचे १,४६० क्विंटल, मुगाचे १८० क्विंटल, मक्याचे १४७ क्विंटल, ज्वारीचे ३७ क्विंटल आणि बाजरीचे ३९ क्विंटल बियाणे आहे.

विभागातील सुमारे २६० अधिकृत विक्रेत्यांना आतापर्यंत ८६ हजार ५८३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये सोयाबीनचे ८३ हजार ७९८ क्विंटल, तुरीचे १,२११ क्विंटल, उडदाचे १,३६९ क्विंटल, मुगाचे ११२ क्विंटल, मक्याचे ३९ क्विंटल, ज्वारीचे १३ क्विंटल आणि बाजरीचे ४२ क्विंटल बियाणे समाविष्ट आहे.

जिल्हानिहाय पाहता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. मात्र पावसाने अद्याप साथ न दिल्याने शेतकरी पेरणीबाबत सावध भूमिका घेत असून बियाणे खरेदीचा वेग मंदावला आहे.

जिल्हानिहाय बियाणे पुरवठा (क्विंटलमध्ये)
जिल्हा एकूण पुरवठा
परभणी ६,८४३
हिंगोली ४,५९८
नांदेड १३,८१९
लातूर ३२,७१०
धाराशिव २४,३५३
सोलापूर ४,२५९*

(*घटकनिहाय आकडेवारीनुसार)

सोयाबीन बियाण्याला सर्वाधिक मागणी

महाबीजकडून वितरित करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये सोयाबीनचा सर्वाधिक वाटा आहे. एकूण पुरवठ्यापैकी ८३ हजार ७९८ क्विंटल सोयाबीन बियाणे विक्रेत्यांकडे पोहोचविण्यात आले आहे. लातूर (३२,२०३ क्विंटल) आणि धाराशिव (२३,५१० क्विंटल) हे सोयाबीन बियाणे पुरवठ्यात आघाडीवर आहेत.

शेतकऱ्यांना संयमाचे आवाहन

महाबीजच्या माहितीनुसार उपलब्ध बियाण्यांपैकी सुमारे ७५ टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे. मात्र पावसाअभावी सध्या विक्री जवळपास ठप्प झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच खरेदी आणि पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.
---
प्रतिक्रिया
पुरवठा केलेल्या बियाण्यांपैकी सुमारे ७५ टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे. मात्र पाऊस नसल्याने विक्री थांबली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ७५ ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर उपलब्ध ओलाव्यावरच पेरणी करावी.
- जगदीशसिंग खोकड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com