

महाबीजने गहू बीजोत्पादकांना
वाढीव दर देण्याची मागणी
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : २०२५-२६ या वर्षातील गहू बीजोत्पादनासाठी महाबीजने नाशिक जिल्ह्यातील उत्पादकांना प्रतिक्विंटल २ हजार ९६३ रुपये दर दिला आहे. मात्र, बाजारभाव आणि पूर्वीच्या जिल्हानिहाय दर निश्चिती धोरणाचा विचार करता प्रतिक्विंटल ३ हजार ३५१ रुपये दर मिळणे अपेक्षित असल्याने बीजोत्पादकांनी वाढीव दराची मागणी केली आहे.
याबाबत ब्राह्मणगाव (तालुका बागलाण,जिल्हा नाशिक) येथील उत्पादक जयंत विष्णू जोशी यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांना नुकतेच ३० ऑक्टोबर रोजी निवेदन पाठवले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले की, महाबीजने सन २०२३-२४ पासून बीजोत्पादकांना देण्यात येणाऱ्या दर निश्चितीच्या धोरणात बदल केला आहे. यापूर्वी जिल्हानिहाय दर निश्चित केले जात होते. या जुन्या धोरणानुसार गव्हाचे बाजारभाव विचारात घेता प्रतिक्विंटल ३ हजार ३५१ रुपये दर मिळणे अपेक्षित असल्याचे जोशी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महाबीजकडून बीजोत्पादकांना देयकाची रक्कम मिळाली, त्या दिवशी बाजारात गव्हाचा सर्वोच्च दर प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपयांपर्यंत होता. सध्याचे बाजारभावही त्यापेक्षा अधिक असल्याने बाजारातील दरांचा विचार करून बीजोत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
गहू बीजोत्पादकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन महाबीज प्रशासनाने दरातील तफावतीचा सकारात्मक विचार करावा आणि जुन्या धोरणानुसार प्रतिक्विंटल ३ हजार ३५१ रुपये दर देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जोशी यांनी केली आहे. या निवेदनासोबत सोबतच सटाणा, मालेगाव आणि कळवण कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दैनंदिन बाजारभावही त्यांनी जोडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.