डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाबळेश्वर शहरात स्वच्छता मोहीम

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाबळेश्वर शहरात स्वच्छता मोहीम

Published on

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे
महाबळेश्वरात स्वच्छता
महाबळेश्वर, ता. ३ ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने व स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या वेळी शहरातील रस्त्यांची दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. यामध्ये कोळी आळी, तानू पटेल स्ट्रीट, मरी पेठ रोड, तसेच नगरपालिका कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
श्री समर्थ बैठकीतील १६७ सदस्यांनी सकाळी साडेसात ते ११ वाजेपर्यंत स्वच्छता केली. ओला व सुका कचरा असा सुमारे दोन टन गोळा करण्यात आला. या वेळी नगरसेवक संतोष शिंदे, ॲड. संजय जंगम, तसेच शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानप्रसंगी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार उपस्थित होते.

------------------------------

05025
महाबळेश्वर : येथे स्वच्छता करताना प्रतिष्ठानचे सदस्य.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com