

माझ्या गावचा महादेव
MDH26B05594, MDH26B05595
माढा-ः हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले श्री परमेश्वर मंदिर (चौकटीत) स्वयंभू महादेवाची पिंड.
माढ्यातील चार महादेव मंदिरे जपतात प्राचीन वारसा
किरण चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. ८ : माढा शहराला प्राचीन धार्मिक अन् ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरात महादेवाची चार मंदिरे असून, या मंदिरांच्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीमुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. यापैकी तीन मंदिरे स्वतंत्र असून, त्यांना शिखर नाही. चौथे मंदिर श्री माढेश्वरी देवी मंदिराच्या डाव्या बाजूस आहे.
स्वयंभू शिवलिंग अन् वीरगळ
कसबा पेठेतील श्री विठ्ठल मंदिराशेजारी श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर आहे. या मंदिरातील स्वयंभू शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हेमाडपंथी पद्धतीने बांधलेल्या या मंदिर परिसरात आढळणारे वीरगळ त्याचा ऐतिहासिक वारसा सांगतात.
एकाच ठिकाणी दोन मंदिरे
माढा शहराच्या वेशीबाहेर एकाच ठिकाणी पूर्वाभिमुख श्री परमेश्वर अन् उत्तराभिमुख उतरेश्वर अशी दोन महादेव मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरांची रचना साधारणपणे सारखी असून, हेमाडपंथी स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये येथे पाहायला मिळतात. मंदिर परिसरात वीरगळही आढळतात.
सूर्यकिरणांचा गर्भगृहात प्रवेश
श्री परमेश्वर मंदिराच्या गर्भगृहात सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील दगडी स्थापत्य हे येथील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सभामंडप, गर्भगृह अन् दगडी स्तंभांची रचना मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देते.
दगडी नक्षीकाम लक्षवेधी
मंदिराच्या प्रवेशभागातील चंद्रशिळा, कीर्तीमुख, गजथर अन् विविध प्रकारचे दगडी नक्षीकाम लक्ष वेधून घेते. गर्भगृहाच्या छतावरील वितानात चक्राकार नक्षीकाम तसेच पाषाणी झुंबरासारखी रचना आढळते. या दगडी कलाकुसरीमुळे मंदिराच्या स्थापत्याचे वेगळेपण अधोरेखित होते.
कसे जाल...
सोलापूरहून मोहोळ-अनगर मार्गे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने माढा सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. बार्शीहून वडशिंगे मार्गे माढ्यापर्यंत सुमारे ३० किलोमीटर अंतर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.