कोयाळी : आचार्य विनोबा भावे गोअभयतीर्थ गोशाळेत वसुबारस निमित्त महादीपोत्सव

आचार्य विनोबा भावे गोअभयतीर्थ गोशाळेत वसुबारस निमित्त महादीपोत्सव
आचार्य विनोबा भावे गोअभयतीर्थ गोशाळेत वसुबारस निमित्त महादीपोत्सवsakal

मांजरी खुर्द : कोयाळी (ता.खेड) येथील आचार्य विनोबा गोसेवक संघ संचलित आचार्य विनोबा भावे गोअभयतीर्थ गोशाळा येथे वसुबारस निमित्त महादीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते गाय वासराचे पूजन करून त्याची सुरुवात झाली

चोपदार यांच्या हस्ते दिवाळीचा प्रथम दिवा लावून गायीला नैवेद्य देण्यात आला. ते म्हणाले, "गोशाळा चालक दीपक निकम यांचे गोरक्षणाचे कार्य खूप मोलाचे आहे. २०१२ साली मीच या गोशाळेचे भूमीपूजन केले होते. त्यावेळी त्यांनी सोडलेला संकल्प प्रत्यक्षात पाहताना आनंद होत आहे. कोरोनाच्या काळात चाऱ्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी अडीचशे गाईंचे पालनपोषणाची जबाबदारी लिलया पेलली, ही कौतुकास्पद बाब आहे.'

आचार्य विनोबा भावे गोअभयतीर्थ गोशाळेत वसुबारस निमित्त महादीपोत्सव
तुम्ही इस्रायलमध्ये सर्वात लोकप्रिय, माझ्या पक्षात या! मोदींना निमंत्रण

संस्थेचे अध्यक्ष निकम म्हणाले, "कोरोना काळातील गाईंना जगविण्याची धडपड खूप संघर्षमय होती. घाबरलेली माणसे घर सोडत नव्हती. गोशाळेवर कोणीही व्यक्ती चारादान करण्यास येत नव्हती. अशा परिस्थितीत चारा मिळविणे अतिशय कठीण होते. परंतु वणवण फिरुन का होईना चारा जमा केला आणि या अडीचशे गाईंना जगविले. या काळात एकाही गाईचा मृत्यू झाला नाही, याचे समाधान आहे.' संस्थेच्या वतीने चोपदार यांचा गाय-वासरुची प्रतीकृती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते विलास बालवडकर, तसेच वसंत गुप्ता, अनुष्का पै, कौशल्या राठी, भगीरथ जाट, नारायण चौधरी, अमन देवासी, महेंद्र चौधरी, गौतम पटेल, किशोरभाई वोरा यांनी यावेळी चारादान केले.संस्थेचे उपाध्यक्ष राघू गायकवाड व सेक्रेटरी मोहिनी कारंडे यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com