Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

महागाव ग्रामीण रुग्णालयातील हल्ल्यानंतर ‘सकाळ’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाची तातडीने दखल; दोन वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कक्षसेवक व सुरक्षारक्षक अशी पाच जणांची तात्पुरती नियुक्ती
Sakal Follow-Up Brings Action: 5 Additional Staff Appointed at Mahagaon Rural Hospital

Sakal Follow-Up Brings Action: 5 Additional Staff Appointed at Mahagaon Rural Hospital

Sakal

Updated on: 

महागाव : महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा आणि सुरक्षेचा प्रश्न ‘सकाळ’ने सातत्याने लावून धरला. आजच्या अंकात महागाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कक्षसेवक आणि सुरक्षारक्षकांची तातडीने आवश्यकता असल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी रात्री उशिरा महागाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयाच्या सेवेसाठी पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात, पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com