

PNE26W44528 - सोलापूर : महालक्ष्मी मातेला जलाभिषेक करताना.
PNE26W44527 - सोलापूर : महालक्ष्मी मातेची उत्सवमूर्ती मिरवणूकीसाठी मंदिरातून पारंपारिक वाद्यांच्या निनादात बाहेर निघताना.
जलकुंभ यात्रेनंतर महालक्ष्मीला जलाभिषेक
पवित्रोत्सवाच्या ३१ व्या वर्षानिमित्त गांधीनगरात भक्तिमय सोहळा; ११ नवकन्यांचे पूजन, झुला उत्सवाची रंगत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : अक्कलकोट रोड, गांधीनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टतर्फे पवित्रोत्सव व वार्षिकोत्सवानिमित्त सोमवारी जलकुंभ यात्रा भक्तिभावात काढण्यात आली. डोक्यावर जलकुंभ घेतलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्याने गांधीनगर परिसर भक्तिमय झाला. मिरवणुकीनंतर श्री महालक्ष्मी देवीला जलाभिषेक करण्यात आला.
मंदिराच्या ३१ व्या पवित्रोत्सवाला रविवारी (ता. २३) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ध्वजारोहण, अखंड दीप आराधना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, नक्षत्र नवग्रह पूजन, श्रीदेवी पंचायतन, अंकुरारोपण, पंचगव्य, गौरी रुद्र सर्वतोभद्र मंडल पूजन व होमहवन झाले. दुपारी महिलांसाठी महाकुंकूमार्चना झाली.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता जलकुंभ यात्रा काढण्यात आली. गांधीनगर परिसरातून परिक्रमा केल्यानंतर देवीला जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूर्णाहुती व महाआरती झाली. सायंकाळी साडेसहा वाजता ११ कन्यांचे नवकन्या पूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या झुला उत्सवात महिला भक्तांनी देवीची स्तुतिगीते गात उत्सवाची रंगत वाढवली. रात्री एकांतवासात देवीला फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर उत्सवाची सांगता झाली. भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
----------------------
कोट : PNE26W44531
३१ वर्षांपासून पवित्रोत्सवाची परंपरा भक्तिभावाने सुरू आहे. जलकुंभ यात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही देवीमातेवरील श्रद्धेची प्रचिती आहे. धार्मिक विधींसोबत समाजातील भक्तांना एकत्र आणणे, हा उत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
- मल्लिकार्जुन गौडा, पंतुलु
----------------------
पौराहित्य नरेंद्र श्रीमल व मल्लिकार्जुन गौडा यांनी केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मल्लेशम कोडम, उपाध्यक्ष सत्यय्या तोरा, सचिव प्रभाकर बुरा, सहसचिव प्रदीप पडगे, खजिनदार प्रभाकर गुंडेली, विश्वस्त राममूर्ती इराबत्ती, व्यंकटेश कुरापाटी, यादगिरी बोद्दुल, भगवंत सिद्राल, सत्यनारायण गुंडला, शशिकांत सिता यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.