भुईंजच्या श्रीमहालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी

भुईंजच्या श्रीमहालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी
Published on: 

भुईंजच्या महालक्ष्मी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

भुईंज, ता. ८ : येथील श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व दसरा उत्सव समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव व वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासून (ता. ११) घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवारी (ता. २०) विजयादशमीच्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. सलग दहा दिवस धार्मिक, पौराणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
चांदीच्या प्रभावळीत विराजमान होणारी देवी महालक्ष्मीची उत्सवमूर्ती भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. सुवर्ण अलंकार, हिरे, रत्न व माणिकांनी सजविलेल्या देवीच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून पहाटे सनई-चौघडा व नगाऱ्यांच्या गजरात देवीची षोडशोपचार पूजा व आरती होणार आहे. कृष्णामाईच्या काठावरील देखणे घाट, महर्षी भृगुऋषींची समाधी आणि पुरातन महालक्ष्मी मंदिरामुळे भुईंजचा यात्रोत्सव धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो. मुख्य यात्रेदिवशी सायंकाळी सीमोल्लंघनाची ऐतिहासिक मिरवणूक, पालखी ग्रामप्रदक्षिणा, रात्री छबिना, पारंपरिक वाद्यांचा गजर व आतषबाजी होणार आहे. यात्राकाळात राज्यस्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा, ललित सहस्रनाम कुंकुमार्चन, दुर्गासप्तशती पठण, भजनी मंडळांचे कार्यक्रम तसेच १४ ऑक्टोबरला ‘फुलवंती’ लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

01559
भुईंज : चांदीच्या प्रभावळीत विराजमान झालेली श्री महालक्ष्मी देवीची उत्सवमूर्ती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com