

पिंपरी, ता.१९ ः शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या महालक्ष्मी (ज्येष्ठागौरी) उत्सवाची आज सांगता झाली. अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात लाडक्या गौराईला आज शहरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. सुवासिनींनी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या माहेरवाशिणीला निरोप दिला.
उत्तरपूजा आणि नैवेद्य
शनिवारी दुपारपर्यंत मूळ नक्षत्रावर विसर्जनाचा मुहूर्त असल्याने, सकाळपासूनच घरोघरी विसर्जनाची लगबग सुरू होती. महिलांनी सकाळच्या वेळी गौरीची पारंपरिक उत्तरपूजा केली. गौरीला दही-भाताचा तसेच लाडूंचा, करंज्या आणि सुक्या मेव्याची शिदोरी म्हणून नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत पारंपरिक गाणी आणि सूक्तांचे पठण केले. नद्यांच्या घाटांवर आणि कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन झाले. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, थेरगाव आणि सांगवी या भागांमध्ये सकाळी ११ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका पाहायला मिळाल्या. महापालिकेच्या वतीने नदीघाटांवर सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. अनेक सोसायट्यांमध्ये घरच्या घरीच टब किंवा बादलीत गौरीचे विसर्जन करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यात आला.
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
तीन दिवस चैतन्य आणि खरेदीने गजबजलेल्या शहरातील चिंचवड गाव, पिंपरी मुख्य बाजारपेठ आणि भोसरी येथील बाजारपेठांमध्ये आज दुपारनंतर काहीशी शांतता पसरली होती.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.