

Municipal Corporation Election
Sakal
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्यांवर हरकती व सूचना देण्याची मुदत सहा दिवसांनी वाढविण्यात आली असून, आता तीन डिसेंबरपर्यंत त्या नोंदवता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे मतदारयादीचा संपूर्ण कार्यक्रम पुढे गेला असून, सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रनिहाय मतदारयादी २२ डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे.