आसू - फलटण तालुक्यात ७ व १४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव*
फलटणमध्ये सात, १४ मार्चला
महाराजस्व अभियानाचे आयोजन
आसू, ता. ३ : महाराष्ट्र शासन महसूल व अन्य विभागांकडे प्रलंबित असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि विविध शासकीय योजनांची माहिती देऊन योग्य लाभार्थ्यांना त्याचे लाभ प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत शासन निर्णयानुसार फलटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एकची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी सात व १४ मार्चला महसूल मंडलनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येत असून, त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.
यामध्ये शनिवारी (ता. सात) गिरवी महसूल मंडलात कुरवली खुर्द ग्रामपंचायत कार्यालय, कोळकी महसूल मंडलात आशीर्वाद मंगल कार्यालय ठाकूरकी, बरड महसूल मंडलात राजुरी येथील नाथाचे मंदिर, आसू मंडलात खंडोबा मंदिर साठे फाटा आणि राजाळे महसूल मंडलात मारुती मंदिर राजाळे येथे, तर शनिवारी (ता. १४) तरडगाव महसूल मंडलात जुनी ग्रामपंचायत चावडी तरडगाव, आदर्की बुद्रुक मंडलात भैरवनाथ मंदिर आदर्की बुद्रुक, होळ महसूल मंडलात दत्त मंदिर काळज आणि वाठार निंबाळकर महसूल मंडलात विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताथवडा येथे या शिबिरांचे
आयोजन करण्यात आले आहे.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

