कास - जावली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन...
जावळीत मंडलनिहाय ‘महाराजस्व’ शिबिर
कास, ता. ३ ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुद्गल यांनी केले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी जावळी तालुक्यातील प्रत्येक महसुली गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम सुरू आहे. या चावडी वाचनामध्ये मयत खातेदार यांचे वारस नोंदी करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, सातबारावरील खातेदार यांचे नावापुढे असलेल्या एकत्र कुटुंब मॅनेजर व अज्ञान पालककर्ता आदी संज्ञा कमी करणे, सातबाराचे इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणे, तगाई, बंडीग आदी बोजे कमी करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेखाची दुरुस्ती करणे, लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करणे, अकृषिक तरतुदीसंदर्भातील सुधारणांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत लाभ होईल, यादृष्टीने कार्यवाही करणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिल्याप्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तरी अंमल देणे, सुधारणा व नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅग, पीएम किसानबाबत जास्तीतजास्त लाभार्थींना लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करून कार्यवाही करण्यात येणार आहे.
जावळी तालुक्यामध्ये सात मार्चला केळघर मंडळातील भैरवनाथ मंदिर हॉल केळघर येथे, १४ मार्चला बामणोली मंडळातील भैरवनाथ मंदिर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, बामणोली, १० एप्रिलला आनेवाडी मंडळ येथे ग्रामपचांयत कार्यालय, हॉल सायगाव येथे, १७ एप्रिलला कुडाळ मंडळ येथे ग्रामपंचायत कार्यालय हॉल, कुडाळ येथे, आठ मे रोजी मेढा मंडळातील तहसील कार्यालय जावळी, मेढा, १५ मे रोजी करहर मंडळ येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह, करहर याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी आशिष बारकुल यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

