म्हैसगाव मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानांतर्गत २४३ प्रकरणे निकाली

म्हैसगाव मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानांतर्गत २४३ प्रकरणे निकाली

Published on

MDH26B05175
म्हैसगाव ः येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरातील लाभार्थी महिलेला कीट देताना प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी दळवे, तहसीलदार संजय भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. आशिष रजपूत, वामनभाऊ उबाळे, नायब तहसीलदार विजय कवडे व मान्यवर.

म्हैसगाव मंडलात महाराजस्व अभियानांतर्गत २४३ प्रकरणे निकाली

माढा, ता. ७ ः माढा तालुक्यातील म्हैसगाव व दारफळ मंडलात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरे झाली. यात सात बारा, फेरफार दुरुस्ती व डिजिटलयाझेशनची म्हैसगावमध्ये २४३ विविध प्रकरणे निकाली काढण्यात आली.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे या उ‌द्देशाने म्हैसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर आयोजित केले. शिबीराचे उद्‍घाटन प्रांताधिकारी जयश्री आव्हाड व जिल्हा परिषद सदस्या अश्विनी दळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले. शिबिराचे प्रास्ताविक नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले.
या शिबिरास तहसीलदार संजय भोसले, पंचायत समिती सदस्य आशिष राजपूत, वामन उबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, निवासी नायब तहसीलदार विजय कवडे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी मंडळ अधिकारी, अव्वल कारकून श्नी. बाभळे, राहुल आटूळे, कृषीचे श्नी. बोराटे साहेब, कृषी सहायक चंद्रकांत मंडलिक, विस्तार अधिकारी बी. के. केताडे, ग्रामपंचायत अधिकारी श्नी. शिरसाट, श्नी. जाधव, म्हैसगावचे सरपंच मुकुंद उबाळे, विलास उबाळे, राजाभाऊ चौधरी, सयाजी पाटील, आबासाहेब खारे, संतोष चौधरी, चेतन मोरे, महादेव मदने उपस्थित होते.

म्हैसगाव मंडलातील निकाली प्रकरणे
शिबिरात १९ फेरफार, १३ सातबारा दुरुस्ती, ६७ डिजिटल सात बारा व ८ अ ४९ विविध प्रमाणपत्रे, ७ मृत्यू दाखले, २३ नमुना आठ उतारे, ६५ महिलांचा लाडकी बहिणी तपशील ऑनलाइन करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com