

Governance at Doorstep: Mega Revenue Camp at Theur Sees Massive Turnout
Sakal
सुनील जगताप
थेऊर : महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य“महाराजस्व समाधान शिबिराला”नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.थेऊरफाटा - थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅक्वेट हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.काकडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पाठपुरावा करत विविध विभागांना एकत्र आणले.नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली जलद गतीने सोडविणे शक्य झाले,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.सर्वसामान्य जनता, शेतकरी,विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले.