
Pune News : महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रिमिअर लिगमध्ये १६० खेळाडूंचा लिलाव
पुणे : पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) माध्यमातून घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रिमिअर लिगचा लिलाव नुकताच कोरेगाव पार्क येथील सेंट लौर्न हॉटेलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला. राज्यातून ३०० खेळाडूंनी त्यांची नावे या लिगसाठी नोंदविली होती. त्यातून १६० खेळाडूंचा लिलाव झाला.
लिलाव झालेल्या खेळाडूंना त्यांना आठ संघमालकांनी आपापल्या संघात बोली लावून स्थान दिले. ही स्पर्धा आठ ते १२ मे दरम्यान पुण्यात होणार आहे. स्पर्धेच्या शुभारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रिमिअर लिगच्या कमिटीकडून देण्यात आली.
लिलावाच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. उदय वारुंजीकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे, उपाध्यक्ष ॲड. जयश्री चौधरी-बिडकर, सचिव ॲड. राहुल कदम तसेच पुणे लॉयर्स सोसायटीचे अध्यक्ष ॲड. कल्याण शिंदे, उपाध्यक्ष ॲड. रेखा करंडे, ॲड. असीम शेख आणि ॲड. विवेकानंद जगदाळे उपस्थित होते.
महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रिमिअर लीगचे हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी आठ संघमालक महाराष्ट्राच्या विविध भागातून घेण्यात आले आहेत. स्पर्धेचा लिलाव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ॲड. पवन कुलकर्णी, ॲड. जयराज गौड, ॲड. गणेश कवडे, ॲड. समीर तांबोळी, ॲड. विजय बद्धी, ॲड. अमित गणपुले, ॲड. नीलेश लडकत, ॲड. उमेश शेडगे, ॲड. प्रसाद पासलकर, ॲड. हेमंत भांड, ॲड. प्रकाश चव्हाण, ॲड. विपिन मिश्रा, ॲड. प्रतीक आरोटे, ॲड. आशिष घमनडे आणि ॲड. सुधाकर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.