पुणे - आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, नल से जल योजना या नागरिकांच्या हिताच्या ठरलेल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्यींना दिलासा मिळाला आहे. गरिबीचे प्रमाण ही कमी होत आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ९५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, एकूण अर्थसंकल्पाच्या हे प्रमाण ६.३ टक्के आहे, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि दिल्ली राज्याचे प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरटिचणीस पुनीत जोशी, रवींद्र शाळेगावकर आदी उपस्थित होते.
मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पात विचार केला आहे तर नागरिकांना शिक्षण, आरोग्य क्षेत्र महाग का आहे असा प्रश्न विचारल्यावर बैजयंत पाडा म्हणाले,‘‘ केंद्र सरकारने शिक्षण, आरोग्य यासाठी जी धोरणे स्वीकारली आहेत. त्याचे परिणाम एकदम दिसून येणार नाहीत, तर त्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत मदत केली जात असल्याने कोट्यावधी नागरिकांना याचा फायदा झाला. खासगी शिक्षण संस्था असल्या तरी सरकार अनेक सरकारी शिक्षण संस्था, वैद्यकीय महाविद्यालये सुरु केल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्यातून दिलासा मिळत आहे. देशात आता अति गरीबी एका टक्क्याच्या खाली आली आहे, तर गरिबीचे प्रमाणही कमी होत आहे, असेही पांडा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने भारताचे विकास दर सर्वात जास्त असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या १०-१२ वर्षापासून विविध राज्यांचा, ग्रामीण भागाचा विकास होत आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात १०० टक्क गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, शेतकऱ्यांचा विकास, महिला सबलीकरण आणि गरीबी निवारण या पाच घटकांवर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी जो निधी उपलब्ध झाला आहे त्यातून पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, स्टार्टअप सुरु होणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प सादर केल्याने केवळ याचा फायदा दिल्लीत झालेला नाही तर संपूर्ण देशभर सकारात्मक चर्चा आहे. देशाचा होणाऱ्या विकासाबाबत जगभरात कौतुक होत आहे, असेही पांडा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.