esakal | Pune : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर आज कडक पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Pune : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर आज कडक पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महाविकास आघाडीने सोमवारी (ता. ११) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सोमवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीने बंदची हाक दिली असून त्यामध्ये महाआघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, त्यांचे घटक पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाचे आयोजन केले आहे. संबंधित बंद शांततेत पार पडावा, यासाठी पुणे पोलिसांकडूनही पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बंदोबस्ताबाबतचा आदेश काढला आहे.

त्यानुसार, दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, दोन पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस आयुक्त, १३ पोलिस निरीक्षक, ७६ सहायक पोलिस निरीक्षक, ८७ पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी झाली आहे. बंदमध्ये सहभागी झालेले पक्ष, संघटनांशी समन्वय ठेवला आहे.’’

loading image
go to top