esakal | शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद -आमदार अशोक पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद -आमदार अशोक पवार

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : लखीमपूर (Lakhimpur) खेडी येथील आंदोलनावर जबाबदार मंत्र्यांच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडून निघून गेला. तो दिवस भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. याचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायत हद्दीतील पुणे -सोलापूर महामार्गावर सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पवार बोलत होते. "जय जवान जय किसान", "या भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय" 'भाजप सरकारचा हाय हाय' अशी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उरुळी कांचन येथे बंदला चांगला प्रतिसाद मिळाला तर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: मुंबई : आमदार निवासाच्या पुनर्विकासातील अडथळा दूर

यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जेष्ठ नागरिक संघाचे सोनबा चौधरी, किसान सेलचे रोहिदास टिळेकर, किसान सेल कार्याध्यक्ष रामभाऊ तुपे, हवेली तालुका ओ.बी.सी. सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष टिळेकर, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, माजी जिल्हाध्यक्ष नंदू काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, युवक विद्यार्थी अध्यक्ष सनी चौधरी, विठ्ठल शितोळे, सुरज चौधरी, आण्णा महाडिक, अमित चौधरी, पांडुरंग काळभोर, हृषीकेश काळभोर, सनी चौधरी, मुकुल काळभोर, संतोष गावडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नारायण राणेंचा बोलताना तोल सुटला; पाहा व्हिडिओ

यापुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, "उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनावर भाजपच्या राज्यमंत्र्यांच्या मुलाने गाडी घातल्यामुळे चार शेतकरी जागीच ठार झाले. हा प्रकार निंदनीय असून, खासदार शरद पवार यांनी या घटनेची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली आहे. हे कृत्य करणाऱ्या राज्यमंत्र्यांच्या मुलाचा धिक्कार करीत आहोत."

माजी आमदार जगन्नाथ शेवाळे म्हणाले," लखीमपुरातील घटना निंदनीय असून, शेतकरी गेली दीड वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार भाजपकडून होत आहे. तेथील सरकारच दुर्लक्ष करतंय ही गोष्ट चीड येणारी आहे. देशात हुकूमशाही सुरू झाली का ? अशी शंका येत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून, याच्या निषेधार्थ जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे."

loading image
go to top