Board Exam: बारावीची परीक्षा आठ, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून;राज्य मंडळाचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Maharashtra Board Exam 2027, : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Maharashtra State Board announces the final SSC and HSC examination timetable for 2027.

Maharashtra State Board announces the final SSC and HSC examination timetable for 2027.

esakal

Updated on: 

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. या परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचे वेळापत्रकही निश्चित केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Loading content, please wait...