esakal | maharashtra budget 2021 : राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

महिलांच्यासाठी मोठी घोषणा करताना अजित पवार यांनी सांगितलं की, महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट दिली जाईल.

maharashtra budget 2021 : राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय? वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - जागतिक महिला दिनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प असून अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. महिलांच्यासाठी मोठी घोषणा करताना अजित पवार यांनी सांगितलं की, महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट दिली जाईल. यामध्ये घर हे महिलेच्याच नावावर असणं बंधनकारक आहे.

सध्या राज्यासमोर कोरोनाच्या काळात घटलेलं उत्पन्न वाढवण्याचं आव्हान आहे. राज्यातील आरोग्य सोवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुर्गम भागात सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अर्थसंकल्पात पुण्यासाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यात क्रीडा विद्यापीठात 4 अभ्यासक्रम सुरु कऱण्याची घोषणा केली आहे. तसंच यामध्ये 200 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. पुण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

काय आहेत घोषणा?

  • पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ उभारणार
  • पुणे- नाशिक मध्ये अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता
  • पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्प उभारण्यात येतील
  • 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर
  • पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
  • आर्थिक - आराखडा तयार करण्याचे काम सुरु
  • राज्य सरकार निधी देणार
  • पुण्यात जैवसुरक्षा प्रयोगशाळा उभारणार
  • पुण्यासाठी नव्या रिंगरोडची घोषणा; 24 हजार कोटींची तरतूद
loading image