राज्यांतर्गत नऊ खरीप पिकांसाठी स्पर्धा जाहीर

राज्यांतर्गत नऊ खरीप पिकांसाठी स्पर्धा जाहीर
Published on

पुणे, ता. १७ : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने २०२६-२७ साठी नऊ खरीप पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर केली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला असून, सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर या स्पर्धेतून विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

पीक स्पर्धेत सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. तालुकास्तरावरील स्पर्धेत शेतकऱ्यांनी नोंदविलेली उत्पादकता आधारभूत धरून पुढील टप्प्यांसाठी विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अधिक उत्पादकता घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपली शेतीपद्धती आणि उत्पादनक्षमता दाखविण्याची संधी मिळणार आहे.

‘‘पीक स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादन घेण्याची स्पर्धात्मक भावना निर्माण होण्यास मदत होते. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर करून उत्पादकता वाढविणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.


राज्यस्तरावर ५० हजारांचे पहिले बक्षीस
तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर अनुक्रमे दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये, तर राज्यस्तरावर ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील नऊ पिके
भात
ज्वारी
बाजरी
मका
नाचणी
तूर
सोयाबीन
भुईमूग
सूर्यफूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com