

पीक परिस्थितीचा अहवाल सादर करा
महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करून सोमवारी (ता. १२) अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. १२) यंत्रणेला दिले.
श्री. बावनकुळे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आज आढावा घेतला. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पीक-पाण्याची तसेच पशुधनाच्या चाऱ्याची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत वस्तुनिष्ठ माहिती येत्या दोन दिवसांत सादर करावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी. पीकस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या ५७.७८ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत १०६.३८ टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पर्जन्यमानानुसार छत्रपती संभाजीनगर-८२.३६ टक्के, जालना-८०.०४ टक्के, नांदेड-७४.२३ टक्के, हिंगोली-७०.०८ टक्के, बीड-६४.०५ टक्के, धाराशिव-६२.७३ टक्के, परभणी-५५.३४ टक्के आणि लातूर-५२.१८ टक्के.
विभागात एकूण ४९६ मंडळे असून सर्वाधिक २१८ मंडळे ही मध्यम (५० ते ७५ टक्के) पावसाच्या श्रेणीत आहेत. विभागातील प्रकल्पांमध्ये मोठ्या ११ प्रकल्पांत ६६.७४ टक्के जलसाठा असून मध्यम प्रकल्प ७६ असून त्यात २१.३४ टक्के, तर लघु प्रकल्प ७८० असून त्यात २०.४८ टक्के जलसाठा आहे.
विभागात सरासरी ९३ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. विभागात असलेल्या ५५.६६ लाख जनावरांसाठी १ कोटी ०७ टन चारा साठा उपलब्ध आहे. पावसाचा खंड २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर हा दीर्घ म्हणजेच २० दिवसांचा आहे. येत्या दोन दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.