कऱ्हाड ः "बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिन विद्यनगर, कऱ्हाड येथे साजरा."

कऱ्हाड ः "बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिन विद्यनगर, कऱ्हाड येथे साजरा."
Published on

‘फिनिक्स’तर्फे विद्यानगरला कार्यक्रम

विद्यानगर, ता. १० : येथील फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले. प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. यू. एस. लांडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ॲड. जस्मिन शेख यांनी भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेचे वाचन केले.

प्राचार्य कालेकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची जडणघडण झाली. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग खुला केला. महाराष्ट्राच्या विकासात कामगार व कष्टकरी जनतेचे योगदान महत्त्वाचे आहे.’’
फाउंडेशनचे सदस्य डॉ. एच. पी. साबळे, बी. डी. वाघमारे, प्रा. बी. बी. कश्यप, बुद्धिभूषण कऱ्हाडकर यांनी सहकार्य केले. डॉ. साबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. डी. व्ही. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बी. डी. वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त नायब तहसीलदार पाटणकर, डॉ. अशोक कांबळे, भारत माने, सुदाम कसबे, उपप्राचार्य आर. ए. कांबळे, रमेश खोब्रागडे, नंदकुमार भोळे, किशोर जाधव आदी उपस्थित होते.


W17540
विद्यानगर ः कार्यक्रमात बोलताना बी. एन. कालेकर. त्या वेळी मान्यवर.

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com