Dengue Cases Rise: दुष्काळाचे दुहेरी संकट; पाणीटंचाईसोबत डेंगीचा धोका वाढला

Dengue Cases Rise Across Maharashtra : दुष्काळामुळे घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढत असल्याने राज्यात डेंगी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत १३ हजार ९५५ रुग्ण आढळले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
Health officials warn that stored water during drought conditions is contributing to mosquito breeding and rising dengue cases.

Health officials warn that stored water during drought conditions is contributing to mosquito breeding and rising dengue cases.

esakal

Updated on: 

पुणे,: सध्‍या महाराष्‍ट्रात दुष्‍काळ पडला आहे. त्‍यामुळे पाण्‍याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्‍याने नागरिक आठवड्यापर्यंत पाणी साठवून ठेवत आहेत. मात्र, हीच बाब डेंगी रुग्‍णांमध्‍ये वाढ होण्‍यास कारणीभूत ठरत असल्‍याची माहिती समोर आली आहे. डेंगीचा एडिस इजिप्‍ती हा डास स्‍वच्‍छ व साचलेल्‍या पाण्‍यात अंडी घालत असल्‍याने राज्‍याच्‍या दुष्‍काळी जिल्ह्यांत खासकरून मराठवाड्यातील जिल्ह्यांत डेंगी रुग्‍णांची संख्‍या अलीकडील काळात वाढली आहे.

Loading content, please wait...