महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

गांधींनी सत्य,अहिंसा,शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी'जय जवान,जय किसान'ची घोषणा देऊन देशातील सैनिकांना व शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला.

पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले. पवार यांनी सकाळी सात वाजता पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान'ची घोषणा देऊन देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रउभारणीतील कार्याचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Deputy Chief Minister ajit pawar tribute to Mahatma Gandhi