
पुणे : पुणे जिल्हा प्रशासनाने राबविलेला पॅटर्न राज्य सरकारने सर्व जिल्हा स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) होणारी कामे गुणवत्तापूर्वक, पारदर्शकपणे आणि वेळेत मार्गी लावण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करून दिली आहे. यामध्ये निधी वेळेत खर्च करणे, विकास कामांचे तुकडे न पाडणे, प्रशासकीय मान्यता जून अखेरपर्यंत देणे आदी सूचना शासनाने सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत.