

पुणे, ता. २० ः मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या गौरवासाठी शुक्रवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजता ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज सातारा गादीच्या छत्रपती वृषालीराजे भोसले या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा’ या संकल्पनेवर आधारित या मोर्चाद्वारे मराठा इतिहासाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संवाद साधून अटक येथील मराठा साम्राज्याच्या नकाशाची पुनर्स्थापना करावी, या विषयाला राज्य शासनाने अधिकृत भूमिका देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत ठामपणे पोहोचवाव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.