

Historical Significance: Shivneri's Role in the Foundation of Maharashtra State
Sakal
जुन्नर : महाराष्ट्र राज्य स्थापनेची मुहूर्तमेढ किल्ले शिवनेरी येथे यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत रोवण्यात आली. एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या किल्ले शिवनेरी सह पायथ्याशी वसलेल्या जुन्नर शहरात यंदाच्या वर्षीपासून दरवर्षी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्था आणि ‘कलोपासक’ संस्थेच्या वतीने सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.