महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या ई-नाम प्रणालीशी जोडल्या

महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या ई-नाम प्रणालीशी जोडल्या

Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.३ ः महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या ई-नाम प्रणालीशी जोडल्या गेल्या असल्याची माहिती कृषी खात्याचे राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. ई नाम प्रणालीशी जोडलेल्या बाजार समित्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्य राजाभाऊ वाजे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील १३३ बाजार समित्या ई नाम प्रणालीशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळाला ५०.४८ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. ज्या बाजार समित्या ई नाम प्रणालीशी जोडण्याची करण्याची शिफारस करण्यात आली आहे, त्यात नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चांदवड, जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीचा समावेश आहे.

रांजणगाव देशमुख मार्गाचा समावेश नाही
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रांजणगाव देशमुख उपकेंद्र तळेगाव रस्ते मार्गाचा पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेत समावेश नसल्याची माहिती ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com