मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Published on

देशाचे आर्थिक इंजिन
जागतिक शर्यतीत: मुख्यमंत्री
महाराष्ट्र सिंगापूर, युएईला मागे टाकेल
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ७ : महाराष्ट्राने सातत्याने गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान राखले असून, आगामी दोन वर्षे हीच गती कायम राहिल्यास आपण सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांनाही आर्थिक बाबीत मागे टाकू, असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असून ते आता जागतिक शर्यतीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर-अमरावती महामार्गावरील लिंगा येथे ''एक्सएसआयओ ॲडव्हान्स इंडस्ट्रिअल अँड लॉजिस्टिक पार्क'' प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याचे निरीक्षण नोंदवत फडणवीस म्हणाले की, आता नवकल्पना, ऑटोमेशन आणि शाश्वततेच्या आधारावर ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादन प्रक्रियेत आमूलाग्र परिवर्तन घडून येत आहे. अनेकदा एखाद्या वस्तूचे उत्पादन एका देशात होते. तर तिचे डिझाईन आणि व्यवस्थापन दुसऱ्या देशातून केले जाते. अशा काळात ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’मुळे उद्योगक्षेत्रात नवे आयाम निर्माण झाले आहेत. भू-राजकीय परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठे बदल होत असून, काही ठिकाणी ती ''वेपनाईज'' देखील केली जात आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत भारतासारख्या लोकशाही देशाने जागतिक पुरवठा साखळीत आपली भूमिका अधिक मजबूत केल्यास ''विकसित भारत''चे स्वप्न निश्चितपणे साकार होईल.
विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात औद्योगिक क्रांतीचे नवे पर्व सुरू होत आहे. जगातील आघाडीच्या पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या ब्लॅकस्टोन आयएनसी यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीचा प्लॅटफॉर्म उभारण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये १५ जागतिक दर्जाची लॉजिस्टिक पार्क्स उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे राज्यभरात सुमारे ३५ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. त्यापैकी एकट्या नागपूर विभागातच १० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल यांनी दिली.
नागपूरमध्ये चार औद्योगिक पार्क
नागपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या चार औद्योगिक पार्कमध्ये सुमारे ६० लाख चौरस फूट बांधकाम क्षमता विकसित केली जाणार आहे, तर राज्यभरातील सर्व प्रकल्पांची एकूण क्षमता जवळपास एक कोटी चौरस फूट असेल. नागपूरमधील ''एक्सएसआयओ ॲडव्हान्स इंडस्ट्रिअल पार्क'' हा प्रकल्प सुमारे १० लाख चौरस फूट क्षेत्रफळात आहे. त्यामध्ये प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग, हेवी इंजिनिअरिंग तसेच मोठ्या प्रमाणातील स्टोरेज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com